China Taiwan Dispute : तैवानच्या अध्यक्षांकडून मोदींनी शुभेच्छा स्विकारल्याबद्दल चीन नाराज…

बीजिंग – लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तैवानच्या अध्यक्षांनी केलेल्या अभिनंदनाचा स्वीकार केल्याबद्दल चीनने भारताकडे नाराजी व्यक्त केली आहे. तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांची गेल्या महिन्यात तैवानच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. आम्ही झपाट्याने वाढणारी तैवान- भारताची भागीदारी वाढवण्यासाठी हिंद- प्रशांत भूप्रदेशात शांतता आणि समृद्धीमध्ये योगदान देण्यासाठी व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांवरील आमच्या सहकार्याचा विस्तार करण्यास उत्सुक आहोत, असे लाइ म्हणाले होते.

अभिनंदनाचा स्वीकार करताना पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर तैवानबरोबरचे संबंध आगामी काळात दृढ करण्याची इच्‍छा व्यक्त केली होती. तुमच्या शुभेच्छा संदेशाबद्दल धन्यवाद. आम्ही परस्पर फायदेशीर आर्थिक आणि तांत्रिक भागीदारीसाठी काम करत असताना मी जवळच्या संबंधांची अपेक्षा करतो, असे एक्सवर पोस्ट केलेल्या त्यांच्या उत्तरात मोदी म्हणाले होते.

याला आक्षेप घेऊन भारताने तैवानशी जवळीक करणे टाळावे, असे चीनने म्हटले आहे. चीनने यावर भारताकडे निषेध नोंदवला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या. चीन तैवानला एक बंडखोर प्रांत मानतो आणि तैवानला चीनच्या मुख्य भूमीशी अगदी सक्तीने पुन्हा एकत्र केले जाणे आवश्यक आहे, असे मानतो.

Sunita Williams Makes History : सुनिता विल्यम्स ठरल्या अंतराळ यानाच्या पहिल्या महिला पायलट….

सर्वप्रथम, तैवान प्रदेशात कोणतेही अध्यक्ष नाहीत. जगात एकच चीन आहे आणि तैवान हा चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना प्रदेशाचा अविभाज्य भाग आहे. एक चीन तत्त्व हे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सर्वत्र प्रचलित एकमतामध्ये मान्यताप्राप्त आहे. भारताने गंभीर राजकीय वक्तव्य केले आहे आणि तैवानच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय गणनेला विरोध केला पाहिजे, असे माओ यांनी प्रसार माध्यमांबरोबरच्या एका वार्तालापाच्या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

French Open 2024 : बोपन्ना-एबडेन जोडीला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का…

गेल्या महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना तैवानचे अध्यक्ष लाई यांनी चीनला धमक्या देणे थांबवण्यास सांगितले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने लोकशाही मुद्यांचा आग्रह धरला होता.