नागरिकांची बारामती आरटीओ कार्यालय तत्काळ चालू करण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अनलॉक केला असल्याने राज्यातील आरटीओ कार्यालये २५ कर्मचाऱ्याच्या उपस्थीती मध्ये चालू असुन अत्यावश्यक सेवतील कामकाज नवीन वाहनांची नोंदणी (रजिस्टेशन) रिक्षा चालकांना १५०० रुपये मदत देण्याचे काम चालू असुन बारामती कार्यालयाकड़ून आज पावेतो बारामती,इंदापुर,दौंड या तीन तालुक्यातील ५६७ रिक्षा चालकांच्या खात्यावर १५०० रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.

तसेच बारामती,इंदापुर,दौंड या तालुक्यातील काही रिक्षा चालकांचे आधार कार्ड हे बँक खत्याला लिंक नसल्याने त्यांचे १५०० रुपये त्यांच्या खत्यावर हस्तांतरीत होत नसल्याने व दौंड,इंदापुर येथील रिक्षा चालकांना फक्त आधार कार्ड लिंक करण्यासाठी ४० ते ५० किलोमीटर अंतरावरुण बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणे भाग पडत असल्याने त्यांना होणारा त्रास व हेलपाटा होऊ नये.

 म्हणून बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दौंड व इंदापुर येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क साधुन दौंड व इंदापुर येथील ज्या रिक्षा चालकांची आदरकार्ड बँकेला लिंक नाहीत.त्यांची आधार कार्ड बँकेला लिंक करण्याची बारामती येथे न येता, त्यांची आधार कार्ड बँकेशी लिंक करण्याची व्यवस्था दौंड व इंदापुर येथील तहसीलदार यांचे मदतीने दौंड व इंदापुर येथे केली आहे.

अत्यावश्यक सेवतील वरील कामे वगळता व लायसन्स साठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लायसन विभागातील कामकाज नंतर चालू करावे. काही वाहनधारकांनी जुनी वाहने विकत घेतली असून सदर वषं हस्तांतरीत करुण त्या वाहनावर त्यांना त्यांनी घेतलेल्या बँकेच्या कर्जाच्या बोजाची नोंद झाल्याशिवाय बँकेकडून व फायनान्स कंपनी कडून त्यांना पेमेंट मिळणार नाही.

सदर वाहन धारकास त्यांनी ज्यांचे वाहन बँकेचे/फायनांस कंपनीचे कर्ज काढून विकत घेतले आहे.त्यांना त्यांच्या वाहनावर जो पर्यंत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकड़ून बैंकेच्या बोजाची नोंद करुण मिळणार नाही.तो पर्यंत त्यांना बैंक व फायनांस कंपनी कडून त्यांना त्यांनी काढलेल्या कर्जाचा चेक मिळणार नाही.त्यामुळे ज्यांच्या कडून वाहन मालकांनी वाहन विकत घेतले आहे.त्यांना त्यांचे पेमेंटही देता नाही.

तसेच ज्यांना लॉकडाऊन लागू होण्यापुर्वी कर्ज मंजूर झाले आहे.व त्यांचे वाहनावर बैंकेच्या/फ़ायनांस कंपनीच्या बोजाची नोंद झाली नसल्याने त्या वाहन मालकास फायनांस कंपनीचे कर्जाचे हप्ते सुद्धा चालू झाले आहेत.

या सर्व प्रकारामुळे वाहन मालक मेटाकुटिला आला असुन या अत्यंत अडचणीच्या काळात वाहन हस्तांतरीत करुण सदर वाहनावर बैंक व फायनांस कंपनीच्या कर्जाच्या बोजाची नोंद काही नियम व अटी पाळून करुण मिळावी.ही मागणी वाहन मालक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.तसेच ऑनलाईन अपायमेंट नुसार वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी सुद्धा करुण मिळावी.व या बाबत राज्य शासनाने व परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे.या बाबतचे योग्य ते आदेश वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाले नाहीत.

राजेंद्र केसकर
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,बारामती