नगर | महासंस्कृती महोत्सवात कृषी विभागाच्या स्टॉल्सद्वारे १ कोटींची उलाढाल

नगर – कृषी विभाग, सांस्कृतिक विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महासंस्कृती महोत्सव, कृषी व बचतगट महोत्सव-२०२४ मध्ये दुसऱ्या दिवसाअखेर कृषी विभागाची १ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

यामध्ये कृषी विभागाचे अवजारे, खते, बी-बियाणे, फळे, यांत्रिकीकरण, कृषी गट, कृषी कंपनी यांच्यासह विविध स्टॉल्स आहेत. कृषी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ व विविध वस्तुंना मोठी मागणी आहे. महिलांचा कल विशेषतः या स्टॉलमध्ये खरेदीचा आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात २ दिवसांत कृषी विभागांतर्गत विविध स्टॉल्सद्वारे सुमारे १ कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली असून, शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यामध्ये मोठी भर पडेल. स्वयंसहाय्यता बचतगटांनी तयार केलेली उत्पादने व चटपटीत अस्सल गावरान खाद्यपदार्थांची विक्री, पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थांची विक्री, हस्तकला, मसाले यांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्सवर नगरकर मोठी गर्दी करीत असून, खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत.