नगर | दरोड्याच्या तयारीत असलेले ४ आरोपी जेरबंद

नगर |  नगर-मनमाड बायपास रोडवरील साईबनकडे जाणारे रोडलगत अंधारात दबा धरून बसलेले दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र एक अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

प्रज्वल प्रताप देशमुख (वय २२, रा. जवळेकडलग, ता. संगमनेर), अशोक रघुनाथ गोडे (वय २४), भरत लक्ष्मण गोडे (वय २५, (दोन्ही रा. तिरडे, ता. अकोले), सुयोग अशोक दवंगे (वय 20, रा. हिवरगांव पावसा, ता. संगमनेर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांचेकडे पळुन गेलेल्या संशयीतांचे नाव विचारले असता अक्षय काळे (रा. सुरेगांव, ता. नगर) असे सांगितले. त्यांच्याकडून १ तलवार, १ दांडके, मिरचीपुड, नायलॉन रस्सी, २ दुचाकी असा एकूण १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यामार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात, व अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, संभाजी कोतकर व अरुण मोरे यांच्या पथकाने केली. अशांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते. यातील आरोपी भरत लक्ष्मण गोडे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द घरफोडी व चोरीचे २ गुन्हे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.