नगर : चांदा येथे दत्त जन्मोत्सव सोहळा

चांदा – नेवासा तालुक्यातील चांदा येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व वैकुंठवासी रोहिदास महाराज चांदेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, भव्य दत्त याग यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.

शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी धार्मिक ध्वजारोहन महंत प्रकाशनंदगिरी महाराज, महंत भास्करगिरी‌ महाराज, सुनिलगिरी महाराज यांच्याहस्ते प्रारंभ होणार असून या कार्यक्रमाची सांगता मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी होणार आहे.

सप्ताहकाळात वैभव काका जोशी‌, प्रवीण महाराज गोसावी, भागवताचार्य नाना महाराज सूर्यवंशी, महादेव महाराज राऊत, ज्ञानेश्वर माऊली कदम, पांडुरंग महाराज घुले, भागवताचार्य पोपट महाराज पाटील, आदिनाथ महाराज शास्त्री, विनोदाचार्य पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तने होतील.

रामायणाचार्य देविदास महाराज आडभाई यांचे कीर्तन होईल. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होईल. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन या सप्ताहाची सांगता होईल.