नगर | शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

नगर – गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांसह समान्य माणसांना प्रतिक्षा असणार्‍या पावसाने शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. यात नगर, राहुरी तालुक्यासह अन्य ठिकाणी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसला तरी यापावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना सुरूवात होणार आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणी होणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्य़ान गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहर व उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसात झाडे उन्मळून पडली. शहरासह केडगाव, सावेडी उपनगरात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची दाणादाण उडाली. तर शुक्रवार नगर शहर, नगर तालुका, राहुरी तालुक्यातील अनेक गावात पावसाने दमदार समाली दिली.यामुळे शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर हासू आले असून उकाड्याने हैराण झालेल्या समान्य माणसांना काहीसा दिला मिळाला आहे.

शुक्रवार दुपारनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढग दाटू आले रात्री विजांचा कडकडाटासह पावसाला सुरू झाली. जिल्ह्यात 97 महसूल मंडळ असून त्यापैकी 36 ठिकाणी 15 मिली मीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसला तरी यापावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना सुरूवात होणार आहे. तर अनेक ठिकाणी अद्याप खरीपाच्या पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचे सांगितले असून या काळात पाऊस झाल्यास त्याचा शेकर्‍यांना फायदाच होणार आहे.