नगर : नियमित आरोग्य तपासणी गरजेची – आ.आशुतोष काळे

कोपरगाव : धावपळीच्या जीवनामध्ये स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कोणत्याही आजाराला सहजपणे न घेता भविष्यातील मोठ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील समाज मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या मोफत आरोग्य तपासणी शिबिर उपक्रमाचे संजयनगर भागातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत करून शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, राजेंद्र आभाळे, धनंजय कहार, सचिन गवारे, शिवाजी कुऱ्हाडे, चंद्रकांत धोत्रे, हारुण शेख, रोशन शेजवळ, विशाल गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, देवराम पगारे, राहुल कालेकर, सोमनाथ रोठे, किरण गुंजाळ, प्रकाश गायकवाड, गणेश कुऱ्हाडे, भाऊसाहेब रोठे, राहुल रोठे, संजय गुंजाळ, कालिदास नाईकनवरे ,

आण्णा धोत्रे, दिलीप आभाळे, नंदू कोपरे, महेश रक्ताटे, रवी बिडवे, तुषार कोतकर, सुनील गायकवाड, मनीषा सपकाळ, अमोल देशमुख, पायल बागुल, वैभवी होन, प्रियंका डोईफोडे, सपना ढोबळे, शीतल गव्हाणे, पंकज जोशी, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या डॉ. सायली ठोंबरे, डॉ. अमित नाइकवाडे, डॉ. पठाण, डॉ. कुलकर्णी, डॉ. मेहरबानसिंग आदींसह नागरिक उपस्थित होते.