कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद

मुंबई : कोरोनाने देशात आता आपले हातपाय पसरले आहेत. त्यातच देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही ३०० च्या पार गेली आहे. याच संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे सरकारने घेतला आहे.

लोकलमधील  प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार लोकल ट्रेन प्रवासावर आजपासून निर्बंध येणार आहे. लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. आज म्हणजे 22 मार्चपासून 31 मार्चपर्यंत लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचे देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता कठोर निर्णय घेत आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Comment