मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा – मनसे

मुंबई –  भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागाने दिलेल्या इशारानुसार अंदमान समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला.  जोरदार पावसाने उभी असलेली बाजरी, कडवळ व इतर तरकारी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.  कोकणातील भातशेतीचे  नुकसान झाले. 


शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसानीच्या   याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे आणि शेताच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्याची विचारपूस करावी अशी साद घातली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत ध्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल,” असं ट्विट मनसे नेते प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

Leave a Comment