जेवणात झुरळ, विद्यार्थ्यांचे आंदोलन; पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रकार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भोजनगृहातर्फे पुरवल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळले. हा प्रकार सोमवारी रात्री आठ नंबर वसतिगृह येथे घडला. यावरून विद्यार्थ्यांनी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केले. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा तीव्र निदर्शने केली.

भोजनगृहात सोमवारी रात्री विद्यार्थी जेवण करताना भाजीत झुरळ आढळले. त्यामुळे जेवण अर्धवट सोडत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पुन्हा विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी केली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिले. आंदोलनात एनएसयूआय, विद्यार्थी संघर्ष कृती समिती, एसएफआय, लोकायत, युक्रांद, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटना सहभागी होत्या.