भिगवणकरांना दिलासा ;  १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, ६ बाकी

भिगवण (वार्ताहर) – भिगवण स्टेशन येथील महिला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ जणांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुरेखा पोळ व आरोग्य अधिकारी डॉ. अमित उदावंत यानी दिली.

इंदापूर तालुक्यातील सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना बारामती येथे तपासणी साठी पाठविण्यात आले होते .त्यांचे बारामती येथील सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये नमुने तपासणी साठी घेऊन पुणे येथे पाठविण्यात आले होते. उपचार घेतलेले दवाखान्यातील} डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय तसेच लॅब चालक यांचे कुटुंबातील सदस्य याना या तपासणी साठी नेण्यात आले होते.

आज त्यांचे तपासणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. इतर १४ व कुटुंबातील ४ असे १८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने भिगवण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसून आले. तर या १८ जनांना कोरोन्टीन करण्यात आले आहे. अजुन ६ रिपोर्ट येणे बाकी असून ते रिपोर्ट निगेटिव्ह यावा यासाठी भिगवण कर प्रार्थना करीत आहेत.

Leave a Comment