संभाजीनगरमध्ये विकासकामांचा शुभारंभ

सातारा – संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. 6/4, 6/5, 6/6 येथील जागेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी यासह ग्रामीण रुग्णालय, क्रीडांगण आदी साडे पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा नारळ फोडून आज शुभारंभ करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते येथील जागेत कुदळं मारण्यात आली.

संभाजीनगर (ता. सातारा) येथील 17 एकर जागेवरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात आज जोरदार शाब्दिक चकमक उडाली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे नारळ फोडण्यात आले. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, ऍड विनित पाटील, काका धुमाळ, संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश माने, सदस्य काशिनाथ गोरड, सुजीत चावरे, सुहास मगर, सुभाष तांगडे, गिरीश बेंद्रे, अनिल पिसाळ, अर्चना देशमुख, गौरव माने, ऍड सागर जाधव उपस्थित होते. जलजीवन मिशन योजनेमध्ये या जागेत फिल्टरेशन प्लॅंट, पाण्याची टाकी, ग्रामीण रुग्णालय व क्रीडांगण ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. संभाजीनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे.

मात्र, काही लोक वेगळ्या विकास कामांच्या भूलथापा देत आहेत. येथील लोकांना जर पायाभूत सुविधांसाठी जागा मिळाली नाही तर जायचे कोठे, असा रोखठोक प्रश्‍न खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी उपस्थित केला. या विकास कामांच्या संदर्भात पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

======================