मोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-२)

मोटार अपघातात उत्पन्नाचा पुरावा नसताना भरपाई (भाग-१)

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक गुप्ता व अनिरुद्ध घोष यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचे निकाल रद्द करुन, जर एखादी व्यक्ती वर्षभर दवाखान्यात उपचार घेत असेल, तर त्याची सेवा सुश्रुषा करणेसाठी किमान प्रतिदिन 200 रुपयेप्रमाणे एखादी व्यक्ती काम करु शकेल; म्हणजेच प्रतिमाह सहा हजार रुपये प्रमाणे वर्षासाठी 72 हजार व उपचाराचा खर्च सव्वा लाख, असे दोन लाख रुपये खर्च त्या व्यक्तीला दिला. त्याचप्रमाणे जर एखादा सुतार जरी निश्‍चीत उत्पन्न नसेल तरी किमान 200 रूपये प्रतिदिन सन 2001 साली कमवू शकतो त्याला महिनाभर सलग काम जरी निश्‍चित नसले तरी किमान पाच हजार रुपये प्रतिमाह या पद्धतीने त्याला नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे. आणि न्यायालयानेही अशा वेळी 1250 रुपये इतके उत्पन्न गृहीत धरण्याऐवजी, त्याच्या कुटुंबीयांना निश्‍चीत उत्पन्न सिद्ध करणे अशक्‍य आहे असे गृहीत धरुन, किमान 200 रुपये प्रतिदिन उत्पन्न गृहीत धरणे आवश्‍यक असल्याची टिप्पणी केली.

सदर अपघातग्रस्ताचे वय लक्षात घेता 16चा गुणांक व त्याच्या मागे त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांची जास्तीची संख्या पाहता त्याचा 1/5 (एक पंचमांश) खर्च वजा करुन भविष्यातील नुकसान भरपाई 40 टक्के; अधिक नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध प्रणय सेठी व इतर (2017)16 एससीसी 680 या खटल्यातील निकालाप्रमाणे 70 हजार रुपये असे एकुण 13 लाख 346 हजार रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली.

एकूणच एखाद्या किरकोळ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न निश्‍चीत नसले, तरी 2001 सालच्या आर्थिक परिस्थीतीनुसार किमान 200 रुपये प्रतिदिन, म्हणजेच सहा हजार रुपये प्रतिमाह एवढे उत्पन्न गृहीत धरुन नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे. तसेच दवाखान्यातील उपचार चालू असताना सेवा सुश्रुषा करण्यासाठीसुद्धा प्रतिदिन किमान 200 रुपये खर्च अधिकचा दिला पाहिजे असे, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाने अनिश्‍चित उत्पन्न असलेल्या अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयाना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment