चढ्या दराने किराणा माल विकणाऱ्यां विरोधात तक्रार करा!

बेल्हे- चढ्या दराने किराणा माल विकत असणाऱ्या नफेखोर दुकानदाराकडून ग्राहकांनी रीतसर पावती घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये दुकानदाराच्या विरुद्ध तक्रार करावी.मध्य महाराष्ट्राचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी सांगितले.

तसेच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आपल्या हक्कच्या रेशन चा नागरिकांनी रेशन दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स पाळत गर्दी न करता लाभ घ्यावा असंही ते म्हणाले.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात आधीच सगळ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तक्रार करणे गरजेचे. नागरिकांनी कोणत्याही धान्याची टंचाई होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिलाय.

Leave a Comment