पिंपरी | कला क्रीडासंस्कार शिबिराची सांगता

पिंपळे गुरव (वार्ताहर) – शिबिरातील प्रशिक्षणार्थीना व गानरत्न विजेत्यांना पिंपरी चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शाम जगताप, अरुण पवार उपस्थित होते. इना फ्रान्सिस यांच्या नटराज वंदन नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीने विविध कला क्रीडा प्रकारांचे विद्यार्थी व महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याच बरोबर मंचावर कधीच न गायलेले स्थानिक हौशी कलाकारांसाठी पिंपळे गुरव गानरत्न 2024 स्पर्धेचे आयोजन केले होते याचाही विजेते घोषित करण्यात आले, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी दिली.

आदिम महिला सरचिटणीस सुनिता कोळप यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये चित्रकला, सुलेखन, मोडी लिपी, नृत्य, रांगोळी, मेहंदी, वारली चित्रकला आणि योगा, कराटे, लाठी काठी, लंगडी, कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारांचे 250 हून अधिक प्रशिक्षणार्थिनी सहभाग घेतला होता.

नामवंत अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये चक्रधर साखरे, कांचन महाजन, अलसबा शेख, वंदना डोंगरे, विजया नागटिळक, अमरजीत कौर, कमलेश शिंदे, प्रशांत सांबरे यांनी विविध कलांचे तर दीपाली झंवर, रुद्र जाधव, मनीष यादव, संतोष बुटानाळ, निरज खरात यांनी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले.

गानरत्न स्पर्धेत शालेय गटात गायत्री बेन्नरू, महाविद्यालयीन गटात अवनी राणे व प्रौढ स्त्री पुरुष गटात चेतना मिसाळ, रश्मी बहेकर, गजानन गरुड अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक संपादन केले. शिवसह्याद्री ढोलताशा पथकाची विशेष कामगिरी म्हणून सन्मान करण्यात आला.