पुणे जिल्हा | राहू येथील मंडळ कार्यालयात गर्दी

राहू, (वार्ताहर)- राहू येथील मंडळ कार्यालयात कुणबी दाखल्यासंदर्भात शिबिराचे आयोजन केले होती. यावेळी लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी मंडळ कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. शिवसंग्रामच्या मागणीला यश आले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी दाखले देण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. परंतु या अनेक ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रे गोळा करण्यात व त्याची माहिती घेण्यात अनेक अडचणी येत होत्या.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके यांनी या संदर्भात तालुक्यातील सोळा मंडळ कार्यालय पातळीवर कुणबी दाखल्यासंदर्भात शिबिराचे आयोजन करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली होती. त्यानुसार मंडळ कार्यालय पातळीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला राहू येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी देखील हजेरी लावली.

प्रत्येक बुधवारी शिबिराचे आयोजन
कुणबी दाखल्यासंदर्भात अनेक कागदपत्रे व वेगवेगळी प्रतिज्ञापत्र आवश्यक असतात. त्या बाबतीत अनेक नागरिक हे अनभिज्ञ आहेत. लगेचच्या लगेच सर्व गोष्टी शक्य होणार नाहीत. त्यामुळे या शिबिराचे आयोजन हे प्रत्येक बुधवारी होणार असल्याचे शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके यांनी सांगितले.