Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांची 6 वी यादी जाहीर, कोणाला कोठून तिकीट मिळाले जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 Congress Candidate 6th List: आज सोमवारी (दि. 25) काँग्रेसने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने राजस्थानमध्ये चार आणि तामिळनाडूच्या एका जागेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीनुसार, राजस्थानच्या अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन रावत, भिलवाडामधून डॉ. दामोदर गुर्जर आणि कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये पक्षाने तिरुनेलवेली लोकसभा मतदारसंघातून अॅड. सी. रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट दिले आहे.

काँग्रेसने रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत राजस्थानमधून दोन आणि महाराष्ट्रातून एका उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून बाळू धानोरकर यांच्‍या पत्‍नी प्रतिभा धानोरकर यांच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली.

दरम्‍यान, काँग्रेसने आतापर्यंत सहा यादी जाहीर करताना 192 उमेदवारांना संधी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 39, दुसऱ्या यादीत 43, तिसऱ्या यादीत 57, चौथ्या यादीत 45, पाचव्या यादीत 3 आणि आता सहाव्या यादीत 5 उमेदवारांना संधी दिली आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली असून सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत.