पायात जे असेल ते काढून मारेन…; ‘तो’ प्रश्न विचारताच कॉंग्रेस नेते पत्रकारांवर भडकले

Congress leader GS Manjunath – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांचे शाब्दिक युध्दही चांगलेच जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची किंमत १०० रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही शेरेबाजी केली जाते आहे.

कर्नाटक कॉंग्रेसचे नेते जी. एस. मंजुनाथ यांना याबाबत विचारण केली असता ते पत्रकारांवर भडकले. अत्यंत वादग्रस्त विधान करताना ते म्हणाले की पायात जे असेल ते काढूनच मारेन. । Congress leader GS Manjunath

जी. एस. मंजुनाथ हे कर्नाटक कॉंग्रेसमधील प्रसिध्द नेत्यांपैकी एक आहेत. आपण स्वत: काय करणार ते सांगतानाच सर्व नागरिकांनीही असेच करावे असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांची ही आक्षेपार्ह टिप्पणी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

कॉंग्रेसचा नेता म्हणून नाहीतर एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला प्रश्‍न विचारावे लागतील. अन्यथा तुम्हाला कोणी विचारणार नाही. जोपर्यंत आपण प्रश्‍न विचारणे शिकत नाही तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याच्या अधिकारास पात्र ठरत नाही.

आता जर पंधरा दिवसांनी निवडणुका होणार आहे तेंव्हा १०० रूपये दर कमी केल्याबद्दल तुम्ही खुष का आहात असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, मंजुनाथ यांच्या विधानाबद्दल कॉंग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.