फळभाज्यांचे भाव घटल्याने खरेदीस सुगीचे दिवस; वाचा ताजे बाजारभाव

पुणे – मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने कांदा, आले, फ्लॉवर, कोबी, वांगी आणि सिमला मिरचीच्या भावातही घट झाली आहे. तर बटाट्याच्या भावात मात्र वाढ झाली असून, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

 

रविवारी येथील बाजारात 70 ते 80 गाड्यांची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 10 ते 11 ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटार 18 ते 20 ट्रक, तर मध्यप्रदेश आणि गुजरात येथून 14 ते 15 ट्रक लसणाची आवक झाली होती.

 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1400 ते 1500 गोणी, कोबी सुमारे 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो सहा ते साडेसहा हजार पेटी, भुईमुग शेंगा सुमारे 50 ते 60 गोणी, घेवडा 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, कांद्यामध्ये जुना 70 ट्रक, तर नवीन कांद्याची 5 ट्रक इतकी आवक झाली.

 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : नवीन 100-300, जुना 200-350, बटाटा : 350-400, लसूण : 600-1100, आले : सातारी 100-250, भेंडी : 150-220, गवार : 200-250, टोमॅटो : 150-200, दोडका : 180-220, हिरवी मिरची : 250-350, दुधी भोपळा : 80-100, चवळी : 150-160 काकडी : 80-100, कारली : हिरवी 150-200, पांढरी 140-150, पापडी : 200, पडवळ : 180-200, फ्लॉवर : 50-80, कोबी : 80-120, वांगी : 100-160, डिंगरी : 160-180, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 80-100, तोंडली : कळी 240-250, जाड : 100-110, शेवगा : 500-650, गाजर : 200-250, वालवर : 200-250, बीट : 200-220, घेवडा : 250-300, कोहळा : 100-120, आर्वी: 100-120, घोसावळे : 140-150, ढेमसे : 200-250, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 400-500, मटार : 400-500, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

Leave a Comment