‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१)

ग्राहकाला, सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेला नकाशा, वैशिष्ठांसह आराखडा योजना या अधिनियमान्वये किंवा त्याअंतर्गत असलेल्या नियम व अटींमध्ये नमूद केलेली अशी इतर माहिती किंवा प्रवर्तकाबरोबर विक्रीसाठी केलेला स्वाक्षरीत करारनामा या संबंधित माहिती प्राप्त करण्याचा हक्‍क असेल.

ग्राहकाला, प्रकल्प पूर्ण होण्याचा टप्पानिहाय वेळापत्रक, प्रकल्पातील पाणी, स्वच्छता, वीज आणि इतर सोयी आणि सेवा ज्या विक्री करारातील अटी आणि शर्तींन्वये त्याच्या आणि प्रवर्तकातर्फे मान्य करण्यात आल्या आहेत त्या माहीत करून घेण्याचा हक्‍क असेल.

ग्राहकाला, कलम 4 च्या उपकलम (2) (सी) खंड (आय) अन्वये प्रवर्तकाने केलेल्या घोषणेनुसार यथास्थिति, सदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या ताब्यावर हक्क सांगण्याचा अधिकार असेल आणि ग्राहकांच्या संघटनेला सामाईक क्षेत्रावरील ताब्यावर हक्क सांगण्याचा अधिकार असेल.

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)

या अधिनियमात तरतुद केल्याप्रमाणे, जर विक्री करारातील अटी-शर्तीनुसार किंवा या कायद्यान्वये प्रर्वतकाची नोंदणी निलंबित किंवा खंडित किंवा रद्‌द झाल्यामुळे प्रवर्तक यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा ताबा देण्यास अपयशी किंवा असमर्थ ठरला तर ग्राहकाला, त्याने भरलेल्या रकमेचा परतावा या कायद्‌यात नमूद केलेल्या व्याजदरासह प्रवर्तकाकडून मिळण्याचा अधिकार असेल.

Leave a Comment