‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१)

ग्राहकाला प्रवर्तकातर्फे यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर, सामाईक क्षेत्राच्या कागदपत्रांसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे आणि नकाशे, प्रवर्तकाकडून मिळण्याचा हक्‍क असेल. प्रत्येक ग्राहक, ज्याने कलम 13 अन्वये यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीबाबत विक्रीचा करार केला आहे तो विक्रीच्या करारात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने आणि वेळेत आवश्‍यक ती देय रक्‍कम अदा करण्यास जबाबदार असेल आणि लागू असेल असे नोंदणी शुल्क, पाणी आणि वीज शुल्क, देखभाल शुल्क, भूई भाडे, महापालिका कर आणि इतर शुल्क योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी भरण्यास जबाबदार असेल.

प्रत्येक ग्राहक, उपकलम (6) मध्ये नमूद बाबींवरील शुल्क अदा करण्यास विलंब झाल्यास, त्या रकमेवर विहित केलेल्या दराने व्याज देण्याकरिता जबाबदार असेल. उपकलम (6) अन्वये असलेल्या दायित्वाची रक्‍कम आणि उपकलम (7) अन्वये असलेल्या व्याजाची रक्‍कम, ग्राहक आणि प्रवर्तकांदरम्यान परस्पर सहमतीने कमी केले जाऊ शकते.
यथास्थिती सदनिका किंवा भूखंड किंवा इमारतीच्या प्रत्येक ग्राहकाने, ग्राहकांची संघटना किंवा मंडळ किंवा सहकारी सोसायटी किंवा फेडरेशन स्थापन करण्यात सहभागी व्हावे. प्रत्येक ग्राहकाने ताबा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत यथास्थिती सदनिका किंवा भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घ्यावा. प्रत्येक ग्राहकाने यथास्थिती सदनिका किंवा भूखंड किंवा इमारतीचे, या कायद्‌यातील कलम 17 उपकलम (1) अन्वये निर्दिष्ट केलेले नोंदणीकृत हस्तांतरण दस्त तयार करण्यात सहभागी व्हावे.

Leave a Comment