बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटला; ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी

मुंबई : विधीमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तयार करण्यात आलेले तैलचित्र अजून चांगले बनवता आले असते, असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले एक मोठे नाव आहे. राजकाराणात असून देखील नेहमीच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत बाळासाहेब दिसले. त्यांनी स्वतः शेकडो आमदार खासदार सभागृहात पाठवले पण स्वतः विधीमंडळाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्याचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे.

23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं विधीमंडळात तैलचित्र लावण्यात येणार आहे. राजकारणात सध्या परिस्थिती बदलेली आहे. एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाही, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी आहे.

या कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेसोबत एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षासाठी महत्वाचे आहे, एक बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत तर दुसरीकडे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं सांगत सत्ता स्थापन केलेले एकनाथ शिंदे आहे या दोघांसाठी बाळासाहेब ठाकरे हा विषय संवेदनशील झाला आहे, बाळासाहेबाच्या हिदुत्वांचा झेंडा घेत शिंदेंनी वेगळी चुल मांडली पण आता त्याचा बाळासाहेबांच्या तैलचित्रांच्या निमित्ताने दोघेही एकत्र दिसण्याची शक्यता आहे.