तांब्याची चोरी करणारे काही तासांत जेरबंद 

वडगाव मावळ  – बंद खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी 35 किलो वजनाचा 20 हजार रुपये किमंतीचा एक तांब्याचा बत्ता (डेंग) चोरून नेली. बेलज (ता. मावळ) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सोमवारी (दि. 23) पहाटे ही घटना घडली.

आखिल समिद खाटिक (वय 30) व सचिन हुसैन वाघमारे (वय 21, दोघे रा. काळेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींना गुरुवारपर्यंत (दि. 26) पोलीस कोठडी सुनावली आहे. काशिनाथ रघुनाथ दगडे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वडगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुद्देमालासह आरोपींना काही तासांत अटक केली. बेलज (ता. मावळ) हद्दीतील शिव तरुण मंडळ आहे.

या मंडळाच्या बंद खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आखिल खाटिक व सचिन वाघमारे यांनी एक ताब्याचा बत्ता (डेंग) चोरून नेला. या बाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपींना कान्हे फाटा (ता. मावळ) येथून मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.

Leave a Comment