लक्षणं न दिसताही होऊ शकतो कोरोना ?  

नवी मुंबई –  भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेतील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी चीनवर आरोप लावले होते की, चीनने कोरोना व्हायरससंबधी डेटा लपवला आहे आणि तो त्यांनी जगातल्या इतर देशांसोबत शेअर करावा. कोरोना व्हायरस संक्रमणासंबंधी आता अशा रूग्णांची माहिती मिळाली आहे जे की, ‘सायलेंट कॅरिअर’ आहेत. असा दावा केला जात आहे की, जगभरात कोरोना यांच्यामुळेच पसरला.

WHO चं काय मत आहे?

WHO ने याबाबत स्पष्ट गाइडलाईन जारी केली आहे. त्यानुसार, लक्षणे दिसत नसली तरी त्या रूग्णांना कोरोनाची लागण झालेल्यांच्या यादीत ठेवलं जाईल. पण चीन सरकारने याला न जुमानता फेब्रुवारीमध्ये क्लासिफिकेशन गाइडलाईन्स बदलल्या. आणि केवळ लक्षणे दिसणाऱ्या लोकांनाच कोरोना संक्रमित मानलं. दरम्यान चीनने कोरोना संक्रमितांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची टेस्ट अनिवार्य केली होती. त्यामुळे या व्हायरसवर कंट्रोल मिळवण्यास त्यांना मदत झाली.

Leave a Comment