निवडणुकीदरम्यान बंगालमध्ये 171 ची रुग्णसंख्या साडेसात हजारवर

कोलकाता – महाराष्ट्रासह देशभर करोना हातपाय पसरत असताना आसाम-पश्‍चिम बंगाल राज्यांतल्या निवडणुका तसेच कुंभमेळ्यातील गर्दीवर टीका होत आहे. पश्‍चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया 2 मार्च रोजी सुरु झाली आणि प्रचारसभा व मतदानामुळे आता ही रुग्णसंख्या 7,760 झाली आहे, तर कुंभ मेळ्यातही शेकदो नागा साधूंना करोनाची बाधा झाली आहे.

रविवारी बंगालच्या निवडणुकीत नवा रंग आला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सभा रद्द केल्या. ते म्हणाले, गर्दीमुळे संसर्ग पसरू शकतो. इतरांनीही विचार करायला हवा. पक्षाने व्हिडिओ काढून मोदी यांच्यावर टीका करत सांगितले की, ते सभेत गर्दीचे कौतुक करतात. दुसरीकडे इतर कॉंग्रेस नेत्यांच्या सभा सुरू आहेत. गांधींच्या सभांमुळे फरक पडत नाही असे भाजपचे म्हणणे आहे, तर भाजप सभा घेत असेल तर आम्हीही घेऊ, असे तृणमूल कॉंग्रेसने सांगितले.

राहुल गांधींनी सभा रद्द केल्या तेव्हा ममता बरॅकपूर, शहा बर्धमान, कॉंग्रेसचे अधीर रंजन मालदात सभा घेत होते.
जेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या सभा रद्द करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्याच पक्षाचे खा. अधीर रंजन चौधरी मालदात सभा घेत होते. अमित शहा पूर्व बर्धमान, तर ममता बॅनर्जी बरॅकपूरमध्ये सभा घेत होते. ममतांनी सभेत तक्रार केली की, आयोगाने प्रचाराची वेळ कमी केल्याने त्या कमी वेळ बोलत आहेत.

राहूल गांधींनी एकूण दोन सभा घेतल्या. मात्र, त्यांच्या सभांना गर्दीच न झाल्याने आपली “झाकली मूठ’ रहावी म्हणून ते प्रचारातून अंग काढून घेत आहेत, असा आरोप भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. शिवाय उद्या पक्षाची कामगिरी उत्तम नाही झाली, तर करोनाचे कारण त्यांना देणे सोपे जाईल, असेही हा नेता म्हणाला. राजकीय सभांना सर्वाधिक गर्दी ही मोदी, शहा आणि ममता बॅनर्जी यांच्या सभांना होत आहे. त्यामुळे कॉंग्रेससह कम्युनिस्ट पक्षाचे नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत आणि करोनाचे कारण सातत्याने पुढे करत आहेत.

मी बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करत आहे. ते आवश्‍यक आहे. इतरांनीही यावर विचार करावा, असे जरी राहुल गांधी म्हणत असले तरी “भाजप राज्यात सभा घेत आहे. जोपर्यंत ते सभा घेतील, आम्हीही सभा घेणारच,’ असे तृणमूल खासदार सौगत राय सांगतात. तर राहुल यांच्या सभांमुळे फरक पडत नाही. त्यांच्या सभांना गर्दीही होत नाही, असा आरोप भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.

Leave a Comment