कोरोना विषाणूचा पोल्ट्री व्यवसायाला फटका

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसायला सुरवात झाली आहे. चिकन खाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होता अशा अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे.

कोरोना विषाणुमुळे राज्यात जवळपास ७०० कोटीचे नुकसान झाले असून, पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी चिकनचे भाव १० रुपये किलोपर्यंत घसरले आहे. कोरोनाच्या अफवेमुळे चिकन खाणाऱ्यांची संख्या घेतली असून बाजारात शुकशुकाट दिसत आहे. चिकन खाल्यामुळे कोरोना होत नाही हे स्पष्ट करून देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Comment