#corona: ‘डब्ल्यूएचओ’ची टीम वुहानमध्ये दाखल

बीजिंग : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ञांनी शनिवारी चीनच्या वुहान शहराला भेट दिली. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे हे शहर मुख्य केंद्र आहे. त्याच वेळी चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी 109 लोकांचा मृत्यू झाला.

डब्ल्यूएचओच्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या पथकाने कोरोना विषयी सविस्तर माहिती घेतली. डब्ल्यूएचओ तज्ञांनी वुहानमधील स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याशी चर्चा केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा विषाणूचा ‘सीफूड मार्केट’मधून प्रसार झाला होता.

दरम्यान आतापर्यंत मरण पावलेल्या लोकांची संख्या 2,345 झाली आहे. तर, कोरोना विषाणूचा 76,288 जणांना संसर्ग झाला आहे,अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

Leave a Comment