राज्यात कोरोनाचा कहर सुरूच! 24 तासांत 28 हजारापेक्षा जास्त बाधितांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुंगांची संख्या वाढतच जाताना दिसत आहे. त्यातच मंगळवारी 28,699 कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 13,165 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,30,641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 80.90% अर्थात 40,715 इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत.

फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येने तळ गाठला होता. मात्र त्यानंतर एकूण सक्रीय रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी 75.15% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.71% आहे.

Leave a Comment