करोनाची तिसरी लाट! ‘नोझल व्हॅक्सिन’ लहान मुलांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार?; जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली :  देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यातच   तिसऱ्या लाटेचे संकट सर्वांसमोर उभे टाकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही  करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांच्या मते करोनाची नोजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. अशी माहिती समोर आली आहे की ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणे  देखील सोपे आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत माहिती दिली. मोठ्या प्रमाणात  शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणे आवश्यक आहे. यासह त्या म्हणाल्या की जेव्हा मुलांमध्ये करोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. त्या पुढे म्हणाल्या की, ‘भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल.’

केंद्र सरकारने शनिवारी असे सांगितले की मुले संसर्गापासून सुरक्षित नाहीत, पण असेही म्हटले आहे की सध्या या विषाणूचा परिणाम मुलांवर कमी होत आहे. जगाची आणि देशाची आकडेवारी पाहिल्यास फक्त 3 ते 4 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे.

NITI आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, ‘जर मुलं कोव्हिड संक्रमित असतील तर बऱ्याचदा कोणतंही लक्षण नसतं किंवा कमीतकमी लक्षणे दिसून येतात. त्यांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. परंतु आपण 10-12 वर्षाच्या मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे ‘.