दिलासादायक! करोना रुग्णांमध्ये घट; गेल्या 24 तासांत 1 लाख 49 हजार रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोनाव्हायरस साथीच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 49 हजार 394 नवीन रुग्ण आढळले असून 1072 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज करोनाचे 13 टक्के रुग्ण कमी मिळाले आहेत. काल एक लाख 72 हजार 433 करोनाचे रुग्ण मिळाले होते. देशातील सकारात्मकता दर आता 9.27 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 14 लाख 35 हजार 569 वर आली आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 55 हजार झाली आहे.याशिवाय देशात गेल्या 24 तासात 2 लाख 46 हजार 674 लोक बरे झाले. आतापर्यंत 4 कोटी 17 हजार 88 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.