राज्यसभेत करोनाचा शिरकाव; एक अधिकारी पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – देशभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात सरकारी सेवेतील अधिकारीही करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राज्यसभेच्या सचिवालयातही एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, राज्यसभेच्या सचिवालयातही एका अधिकाऱ्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर राज्यसभेच्या अॅनेक्स बिल्डिंगचे दोन माजले पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. परिसरात सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,466 नवीन रुग्ण आढळले. कोरोनाची नवीन प्रकरणं अस्तित्त्वात आल्याने देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 1,65,799 झाली आहे.

Leave a Comment