भारताच्या फिरकी गोलंदाज राहुल शर्मावर कोसळला दु:खाचा डोंगर

सद्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु याच महामारीने जगभरात बऱ्याच लोकांचा बळी घेतला आहे. अशातच आता भारताचा फिरकीपटू राहुल शर्मा याच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन झाले. याबद्दलची माहिती स्वता: राहुल शर्माने ट्विट करुन दिली.

राहुल शर्माने ट्विट करताना लिहले आहे की, ‘शर्मा साहब खूप घाई केली. माफ करा मी तुम्हाला या कोरोनापासून वाचवू शकलो नाही. डॅड, तुमच्याशिवाय आयुष्य सारखे असणार नाही. मी तुमच्याकडून माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी शिकलो आहे. तुमची लढावू वृत्ती, इच्छाशक्ती, मेहनत, समर्पण. तुमच्यावर माझे नेहमीच प्रेम आहे. ईश्वरा माझ्या वडीलांची काळजी घे.’

त्याचबरोबर राहुल शर्माने अजून एक ट्विट करत लिहले आहे की,‘मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचे स्वप्न पूर्ण करेल, मी भारतीय संघात पुनरागमन करेल.’

राहुलने ट्विट केल्यानंतर बर्याच लोकांना समजले की त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंनी त्याच्या ट्विटवर कमेंट करताना त्याच्या वडिलांसाठी श्रद्धांजली वाहिली आणि त्याचे सांत्वन केले.

 

 

 

राहुल शर्माची कारकीर्द-
राहुल शर्माने २०११ साली वेस्ट इंडिज विरुद्ध वनडेत भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याचबरोबर २०१२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघाचे वनडेआणि टी-२० मध्ये प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ४ आणि २ सामने खेळले आहेत. त्याने वनडेत ६ विकेट्स आणि टी-२० मध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेत दिल्लीविरुद्ध २०१० साली पदार्पण केले होते. या स्पर्धेत त्याने डेक्कन चार्जेस, पुणे वारीयर्स, दिल्ली डेअरडेव्हिलस आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ४४ आयपीएल सामन्यात ४० विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a Comment