इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

सातारा – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मंगळवार पेठ परिसरात इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 10 जणांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी आदेश काढुन लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरू नये म्हणून लॉकडाऊन केले आहे . म जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयात अधिसुचना काढून साथरोग प्रतिबंध कायदा 1987 हा मार्च 2020 पासून लागु केला आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. या आदेशानुसार एकावेळी 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई केलेली आहे.

सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शाहपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, धनंजय कुंभार, पांढरपट्टे व त्यांचे सहकारी शाहपूरी पोलीस ठाणे अंतर्गत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मंगळवार पेठेतील आंब्याच्या झाडाच्या कट्टयावर व परिसरात इव्हिनींग वॉक करताना काही नागरिक आढळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप रामचंद्र फासे (वय – 54),अमेश हणमंत शेंडे (वय – 59) रा. मंगळवार पेठ, विठ्ठल भिकु देवरे (वय – 46) रा . चिमणपुरापेठ सातारा, नितीन रामचंद्र येवले (वय – 30) रा . गडकर आळी , सर्वोदय सोसायटी शाहुपूरी, प्रदिप पांडुरंग जोशी (वय – 64 वर्षे), सुरेश वासुदेव नारकर (वय – 60) वर्षे , रा . मंगळवार पेठ,रविकांत सदाशिव जोशी (वय – ३५),शिवाजी शंकर जाधव (वय – 75), रोहिदास निवृत्ती जाधव वय – 65 वर्षे रा . व्यंकटपुरा पेठ , संजय गणेश दिक्षीत (वय – 56) रा . मंगळवारपेठ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Leave a Comment