प्रमाणपत्रासाठी खासगी डॉक्‍टरांकडे गर्दी

वाघोली- कामगार, स्थलांतरितांना परराज्यात, परजिल्ह्यात जाण्यासाठी खाजगी डॉक्‍टरांचे मेडिकल सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार असल्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे वाघोलीतील खासगी डॉक्‍टरांकडे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही डॉक्‍टरांनी सर्टिफिकेट देण्यास सुरुवात केली असून फी देखील आकारली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

वाघोली कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्थलांतरितांना मेडिकल सर्टिफिकेट देण्यात येत नाही. तरीदेखील आरोग्य केंद्राबाहेर नागरिक विचारपूस करण्यासाठी येत असतात. मेडिकल सर्टिफिकेट खासगी डॉक्‍टरांशिवाय मिळणार नसल्याने नागरिक खासगी दवाखान्यात जात आहेत.

Leave a Comment