#CWC23 #AUSvSL Live Score : श्रीलंकेच्या बिनबाद 100 धावा पूर्ण, निसांका-परेरा दोघांचीही अर्धशतकाकडे वाटचाल…

ICC ODI World Cup 2023 Australia vs Sri Lanka Live Score : आज, विश्वचषक 2023 च्या 14 व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा सामना 1996 च्या चॅम्पियन श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत खराब झाली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करतील. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू झाला आहे.

श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. नियमित कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी चमिका करुणारत्ने आणि लाहिरू कुमारा प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

AUS vs SL Live Score : सध्या 17.4 षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या एकही विकेट न गमावता 100 धावा आहे. सध्या, कुसल परेरा आणि पथुम निसांका क्रीजवर असून परेरा याच्या  54चेंडूत 45* धावा  तर निसांकाच्या 52 चेंडूत 47* धावा  झाल्या आहेत.

AUS vs SL दोन्ही संघांचे Playing-11 –

ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलालागे, महिश तिक्षना, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

दरम्यान, पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 10 संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -1.846 आहे. -1.161 च्या नेट रन रेटसह श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे.