#CWC23 INDvPAK Live Score : पाकला सातवा धक्का; सिराजनंतर कुलदीप आणि बुमराहने केला कहर…

World Cup 2023 #INDvPAK Match Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे. टीम इंडियाचा रेकॉर्ड 7-0 असा आहे.

पाकिस्तानच्या सात विकेट पडल्या

पाकिस्तानचे सात फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. 36व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शादाब खानला क्लीन बोल्ड केले. शादाबला पाच चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. सध्या पाकिस्तानच्या 37.1 षटकात 7 बाद 175 धावा झाल्या आहेत. आता हसन अली मोहम्मद नवाजसोबत क्रीजवर आहे.

त्याआधी जसप्रीत बुमराहनेच भारताला सहावे यश मिळवून दिले. 33व्या षटकात कुलदीपने दोन बळी घेतल्यानंतर बुमराहने पुढच्याच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने 34व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड केले. रिझवानचे अर्धशतक हुकले. 69 चेंडूत 49 धावा करून तो बाद झाला.

पाकला पाचवा धक्का, कुलदीपचे दुसरे यश

सौद शकीलला बाद केल्यानंतर कुलदीप यादवने इफ्तिखार अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इफ्तिखार चार चेंडूत चार धावा करून क्लीन बोल्ड झाला. या सामन्यात कुलदीपला दुसरे यश मिळाले.

कुलदीपला पहिले यश मिळाले

या सामन्यात कुलदीप यादवला पहिले यश मिळाले. त्याने 33व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डावखुरा फलंदाज सौद शकीलला (एलबीडब्ल्यू LBW) पायचीत केले. कुलदीपचा चेंडू शकीलच्या पॅडला लागला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, पण पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. कुलदीप आणि यष्टिरक्षक केएल राहुलचा सल्ला घेत कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. कुलदीपचा चेंडू यष्टीच्या बरोबरीने असल्याचे रिव्ह्यूमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर सौद शकीलला बाद घोषित करण्यात आले. त्याला 10 चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या.

पाकिस्तानला सर्वात मोठा आणि तिसरा धक्का…

मोहम्मद सिराजने पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने 30 व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला क्लीन बोल्ड (त्रिफळाचित) केले. 58 चेंडूत 50 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. बाबरने रिजवानसोबत चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली.

दुसरा धक्का, इमाम हक माघारी…

त्यापूर्वी, सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमाम 38 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. हार्दिकच्या आउटगोइंग चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. पाकिस्तानची धावसंख्या 13 षटकात 2 बाद 74 धावा आहे. बाबर आझम 16 धावांवर तर मोहम्मद रिझवान एका धावेवर नाबाद आहे.

पहिला धक्का, अब्दुल्ला शफिक बाद…

मोहम्मद सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले. डावाच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अब्दुल्ला शफिकला बाद केले. शफिकला त्याचा चेंडू लेग साइडला खेळायचा होता, पण तो चुकला. चेंडू थेट त्याच्या पॅडवर गेला. शफिकचा पाय यष्टीच्या समोर होता. सिराजच्या अपिलवर पंचांनी शफीकला बाद घोषित केले. शफीक 24 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. शफीकने इमाम उल हकसह पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली.

दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे :-

भारत : शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्‍यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.