satara | डी.जी. कॉलेजच्या बँकिंग स्पर्धा परीक्षा

सातारा (प्रतिनिधी) – येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे स्टेट बँक, आय. बी. पी. एस व इतर बँकिंग आणि वित्तीय संस्थामधील नोकर भरतीच्या पूर्वतयारीसाठी जून २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दररोज सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत बँकिंग भरती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केलेले आहे.

देशातील खाजगी बँका व विमा कंपन्या तसेच विविध नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँका व शासनाच्या विविध नोकर भरती देखील आयबीपीएस च्या धर्तीवर होत आहेत. त्यामुळे बँकिंग, वित्तीय व शासकीय नोकर भरतीच्या या सर्व परीक्षांची योग्य तयारी करून घेण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रशिक्षण वर्गात गणितीय व सांख्यिकीय अभियोग्यता, बुद्दीमापन, तार्किक योग्यता, इंग्रजी भाषा व बँकिंगची तयारी करून घेतली जाणार आहे. याकरिता तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आलेली असून या मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वातानुकूलित क्लासरूम, वातानुकूलित अभ्यासिका व संगणक कक्ष उपलब्ध करून दिला जाणार आहे.

प्रशिक्षण वर्गामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि अंतिम वर्षाला असणारे तसेच पदवी पूर्ण झालेले युवक-युवती देखील प्रवेश घेऊ शकतात. हा मार्गदर्शन वर्ग सर्वांसाठी खुला असून इतर महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. प्रवेश घेण्या-या विद्यार्थ्यांना दररोज तज्ञाद्वारे मार्गदर्शन, ग्रंथालय, संगणक लॅब, वातानुकुलीत अभ्यासिका, मॉक इंटरव्युव्ह, नोकरी अपडेट्सची सुविधा उपलब्ध आहे.

मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वय डॉ. विजय कुंभार यांनी केले आहे. प्रवेशा करिता महाविद्यालयाच्या
https://enrollonline.co.in/Registration/Apply/DGCCS या वेबसाईटवरील ऑनलाईन अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.