पिंपरी | श्री एकविरा विद्या मंदिरचा मावळ तालुक्यात डंका

कार्ला, (वार्ताहर) – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियनाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॅलेजचा मावळात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

मावळ तालुक्यातील प्राथमिक व खासगी अशा एकूण ४२९ शाळामंधून खासगी शाळेमध्ये तालुक्यात द्वितीय स्थान मिळवले आहे. या पूर्वी श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी शिष्यवृती व एनएमएसएस परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकली आहे. विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे यांंच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संजय वंजारे व सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱयांच्या सहकार्याने हे यश मिळाले आहे.

या विषयी संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे ,मावळ गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सह सचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, माजी सभापती शरदराव हुलावळे, दीपक हुलावळे, सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, केंद्रप्रमुख सुहास विटे यांंच्यासह सर्व ग्रामपंचात सदस्य व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, पालक, कार्ला ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.