मेहबूबा यांच्या पासपोर्टवरील नाव बदलासाठी कन्येचा अर्ज

श्रीनगर – आपल्या पासपोर्टवरील पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांचे नाव बदलण्यासाठी मेहबुबा यांच्या ज्येष्ठ कन्येने अर्ज केला आहे. या संदर्भातील एक नोटीस स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मेहबुबा यांची ज्येष्ठ कन्या इर्तिका जावेद यांनी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. 

“माझ्या पासपोर्टवरील आईचे नाव मेहबूबा मुफ्ती बदलून मेहबूबा सय्यद असे करण्याची माझी ईच्छा आहे.’ असे इर्तिका शाह यांनी आपल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. या नोटीसीमध्ये इर्तिका शाह यांनी आपला पत्ता फेअरव्ह्यू हाऊस गुपकार रोड, श्रीनगर, काश्‍मीर-190001 असा दिला आहे.

जर कोणाला हा नावातील बदल करण्यास आक्षेप असेल, अर संबंधित अधिकाऱ्यांना 7 दिवसात संपर्क करावा. त्यानंतर घेतलेल्या आक्षेपास उत्तर दिले जाणार नाही, असेही त्यांनी आपल्या पब्लिक नोटीसीमध्ये म्हटले आहे.

मेहबूबा मुफ्ती आणि त्यांचे पती एकत्र राहत नाहीत. या दाम्पत्याला इल्तिजा आणि इर्तिका या दोन कन्या आहेत. लहान मुलीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून मुफ्ती आडनाव घेतले. तर थोरल्या कन्येने आपल्या वडिलांचे आडनाव स्वीकारले आहे. 

Leave a Comment