DC vs CSK : पंत – वॉर्नरची दमदार फटकेबाजी ! दिल्लीकडून चेन्नईला 192 रन्सचं तगडं आव्हान..

DC vs CSK Live Score : डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. मथिशा पाथिरानाने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने केलेली गोलंदाजी चांगलीच लक्षवेधी ठरली.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉने केली. पृथ्वी शॉला टीममध्ये घेण्याचा निर्णय सार्थकी ठरला.वॉर्नर आणि शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्सला वेगवान सुरुवात करून दिली. यावेळी दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होते. पहिल्या पाच ओव्हर्समध्ये दिल्लीने एकही विकेट्स न गमावता ४२ रन्स बोर्डावर लावले होते.

10 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानने दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नरला (52) पाथिरानाकडून झेलबाद करत चेन्नईचे खाते उघडले.त्यानंतर ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. | DC vs CSK Live Score

रवींद्र जडेजाने दिल्लीला 103 रन्सवरती दुसरा झटका देत पृथ्वी शॉ (43) ला आऊट केले.त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने एका षटकात दोन मोठ्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. मिचेल मार्श आणि ट्रिस्टन स्टब्सला पाथीरानाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 15 व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी गमावून 143 धावा बोर्डावर लावल्या होत्या. | DC vs CSK Live Score

पंतची दमदार बॅटिंग
मिरॅकल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषभ पंतने चेन्नईविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्याने 31 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. मैदानात परतल्यानंतर त्याचे हे पहिले अर्धशतक आहे, फिफ्टी केल्यानंतर तो लगेच पॅव्हेलियनमध्ये परतला. | DC vs CSK Live Score

दिल्लीने चेन्नईविरुद्ध 191 धावा केल्या आहेत. चेन्नईला विजयासाठी 120 चेंडूत 192 धावा करायच्या आहेत.

GT vs SRH : सुदर्शन-मिलरच्या खेळीने गुजरातचा विजय सोपा.. सनरायझर्सवर 7 विकेट्सने केली मात

Purple Cap IPL 2024 : 11 सामन्यांनंतर पर्पल कॅप कोणाकडे ? वाचा सविस्तर..