सांगली जिल्ह्यातील भिकवडीतील करोनाबाधित वृद्धाचा मृत्यू, बाधितांची संख्या 70 वर

सांगली-सांगली जिल्ह्यातील आणखी ८ जणांना करोनाची लागण झाली असून भिकवडी येथील एका ६८ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

या ८ जणांमध्ये शिराळा तालुक्यातील मोहरे आणि रेड येथील २ व्यक्ती, आटपाडीमधील १, आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धमधील २ बहिणी आणि जत तालुक्यातील बाळेखिंडीमधील १, पिंपरी खुर्द येथील १ असे एकूण ८ जण पॉझिटिव्ह आले. भिकवडी येथील ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 70 झाली आहे. तर 30 जणांवर आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.

Leave a Comment