एका शेतकऱ्याचा मृत्यू; दोन जखमी; शेतकऱ्यांचे दिल्ली कूच दोन दिवस लांबणीवर

नवी दिल्ली – हरियाणाची खनौरी बॉर्डर येथे निदर्शक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत आज एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हरियाणा पोलिसांनी याचा इन्कार केला असला तरी शेतकऱ्यांनी आपले दिल्ली कूच आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

मात्र निदर्शने सुरूच राहतील असे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी म्हटले आहे.खनौरी सीमेवरचे वातावरण अगदीच बिघडले आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधूराचे अनेक राउंड फायर केले. रबरी बुलेटस्‌ही डागण्यात आल्या.

१. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे ऑल इंडिया किसान सभेचे म्हणणे.

२. संबंधित शेतकऱ्याला पटियाळाच्या ज्या रूग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला गोळी लागली होती. एकूण तीन जणांना खनौरी येथून आणले होते.

त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती स्थिर. डोक्यावर आणि मांडीवर गोळी लागल्याचा दावा. अधिकृत दुजोरा मात्र नाही.

३. आता पुढील दोन दिवस दिल्लीकडे जाणे स्थगित केल्याचे शेतकरी नेते पंधेर यांनी सांगितले. सरकारकडून दडपशाहीचा त्यांनी केला आरोप. सरकार आमच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्यामुळेच चर्चा फिसकटली असा पंधेर यांचा दावा.