कंपनीचा निर्णय चर्चेत..! आता घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठीही कर्मचाऱ्यांना मिळणार ‘रजा’

लंडन –  आधुनिक काळामध्ये कंपन्यांमध्ये किंवा सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात येतात कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रजेचे नियम हे शिथिल करण्यात येतात याचाच पुढचा भाग म्हणून आता युरोप आणि अमेरिकेतील अनेक खाजगी कंपन्यांनी आणि काही सरकारी विभागांनी सुद्धा त्यांचे जे कर्मचारी घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये गुंतले आहेत.

त्यांना या न्यायालयीन कामासाठी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे महिलांना मॅटरनिटी लिव्ह आणि मासिक पाळी काळात रजा देण्याचा आणि पुरुषांना पॅटर्निटी लिव्ह देण्याचा निर्णयही यापूर्वी झाला आहे आता जे पुरुष किंवा स्त्री कर्मचारी वैवाहिक संबंध तोडण्याच्या उद्देशाने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये घटस्फोटाची मागणी करत आहेत.

त्यांना या कामासाठी रजा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सोयीने कार्यालयात काम करावे असेही सुचवण्यात आले आहे ही प्रक्रिया सुरू असताना अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती वाईट असते ते योग्य प्रकारे काम करण्याच्या मनस्थितीत नसतात म्हणूनच त्यांच्या सोयीने कामाच्या अटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 2022 मधील अमेरिकेतील एका आघाडीच्या कर्मचारीने त्या कंपनीत काम करणाऱ्या 12000 कर्मचाऱ्यांसाठी घटस्फोटप्रक्रिये बाबत एक प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला होता इंग्लंड मधील अनेक खाजगी कंपन्यांनी घटस्फोट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी काही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक आकडेवारीचा विचार करता जगामध्ये पोर्तुगाल या देशामध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वात जास्त आहे त्या खालोखाल रशिया युक्रेन लक्झॅमबर्ग आणि स्पेन या देशांमध्ये सुद्धा घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे झालेल्या एका संशोधनाप्रमाणे घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुरुषांना त्या प्रक्रियेची फारशी लाज वाटत नाही मात्र अनेक महिलांना मात्र घटस्फोट घेतल्याबद्दल लाज वाटत असल्याचे समोर येत आहे म्हणून घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा स्त्री आणि पुरुष यांचे मानसिक समुपदेशन करण्यासाठी सुद्धा काही संघटनांनी आता काम सुरू केले आहे.