दिल्लीतील कारखान्याला भीषण आग ; तीन जणांचा जागीच मृत्यू, सहा जण जखमी

Delhi Narela Fire । दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका डाळीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतंय. तर या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल Delhi Narela Fire ।

दिल्लीच्या नरेला भागात कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रदीर्घ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. आता आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांकडून तपासात सुरु  Delhi Narela Fire ।

दिल्ली पोलिसांनी, “या भीषण आगीच्या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देखील सुरू आहे.” असे सांगितले आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली. कारखान्यातील कामगारही मदतीसाठी जोरजोरात ओरडत होते. दरम्यान, लोकांनी या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. कारखान्यात सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.