पेयजल योजना कामाच्या चौकशीची मागणी; ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नगर: नगर तालुक्‍यातील नांदगाव येथे पेयजल योजनेचे काम झाले आहे. या योजनेअंतर्गत झालेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय असून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक रावसाहेब वर्षे, लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रोहिदास उमाप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नांदगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत (2012-2013 साठी) विविध कामांसाठी 50 लाखांचा निधी शासनाकडून देण्यात आला. मात्र संबंधितांनी हलक्‍या दर्जाचे साहित्य वापरून गैरव्यवहार केला आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून उन्हाचा कडाखा जाणवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या गंभिर होत चालली आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी विविध पाणी योजना गावात सुरु करण्यात येत आहेत. परंतु या योजनांची अमंलबजावणी स्थानिक प्रशासनाकडून होत नाही.

पेयजल योजनेचे काम झाले निकृष्ठ झाले असून लोखंडी पाईप ऐवजी अनेक ठीकाणी पीव्हीसी पाईप टाकण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी. एकीकडे जिल्ह्याभरात नागरिकांची तहान भागविण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे निधी येवून ही नागरिकांची तहान भागवली जात नसल्याने संबंधित योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, जिल्हा परिषद अध्यक्षांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

Leave a Comment