“मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली…” ; उद्धव ठाकरेंच्या ‘टरबूज’ टीकेला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray । लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर आता राजकीय रंग चढताना दिसत आहे.  या प्रचारादरम्यान सर्वच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काही सभांमध्ये ‘टरबूज’ असा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच नकली शिवसेना या मोदींनी केलेल्या टीकेचाही खास शैलीत समाचार घेतला. या सभेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘टरबूज’ असा केला. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.

मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं Devendra Fadnavis on Uddhav Thackeray । 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून यांची निराशा दिसतेय. त्यांच्याकडे लोकांशी बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत सुटलेत. मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. मात्र मला ते शोभत नाही. प्रगल्भ नेत्यांनी असं बोलायचं नसतं. मला वाटतं की उद्धव ठाकरे यांना त्यांचा पराभव दिसतोय त्यामुळेच त्यांची निराशा वाढली आहे. या निराशेतून त्यांची शिवराळ भाषा सुरू झाली आहे. परंतु, त्यांनी अशी कितीही शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही, त्यांच्याकडे जाणार नाही.

“तुम्ही कोणाबद्दल बोललात? टरबूज? म्हणजे कोण? Devendra Fadnavis on Uddhav Thackeray । 
सोलापूरच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते, “तुम्ही कोणाबद्दल बोललात? टरबूज? म्हणजे कोण? मी ज्यांना मागे फडतूस म्हणालो होतो ते का? आता मी बोलत नाही. मी फडतूस म्हटलं होतं, पण आता तसं म्हणत नाही. मी त्यांना कलंक बोललो होतो पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटतं. त्यांनीच परवा रायगडमध्ये एक विनोद केला. ते जनतेला म्हणाले, मोदींची बाकीची कामं सोडून द्या, म्हणजेच मोदींनी कामं केली नाही हे त्यांनी मान्य केलं.

हेही वाचा 
उद्धव ठाकरेंची जहरी टीका,’मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती आता मात्र…’