पुणे | पुणेकरांसाठी “धंगेकरांचा शब्द’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासह, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच शासकीय सुविधा, युवक व महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा-सुव्यवस्थेवर भर, पुण्यासाठी “आयआयएम’ व “आयआयटी’सारख्या संस्थांसाठी पाठपुरावा करणारी आश्वासने असलेला “पुण्यासाठी धंगेकरचा शब्द..!’ अशा आशयाचा लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा जाहीरनामा सोमवारी प्रकाशित करण्यात आला. काॅंग्रेस भवन येथे डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडले.

धंगेकर यांच्या जाहीरनाम्यातील आश्वासने

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरण
– आरक्षित जागांवर बहुमजली पार्किंग
– ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा
– ज्येष्ठांना औषध खरेदीत सवलतीसाठी प्रयत्न
– ड्रग्जमुक्त शहर करण्यासह महिला सुरक्षेसाठी प्रयत्न
– प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक
– प्रत्येक मतदारसंघात प्रसूतीकेंद्र
– मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न
– शहराला पर्यटनाचे केंद्र बनविणार
– चारही दिशांना क्रीडा संकुल उभारणार
– पुण्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार
– घरेलू कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
– रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करणार
– पाणीपुरवठा, जलनिस्सा:रण योजना पूर्ण करणार
– स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोफत अभ्यासिकांची सुविधा