याला म्हणतात ‘धूम’स्टाईल चोरी… मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या ट्रकमधून चोरलं सामान, पाहा Video

Dhoom style | viral Video : शाजापूर महामार्गावर भरदिवसा चोरीच्या सतत घटना घडतात. ट्रकचालकांनीही चोरीच्या अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, असं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चोरीचा हा स्टंट तुमच्या सुद्धा अंगावर काटा आणणारा आहे. या चोरट्यांनी एकदम खतरनाक शैलीत चोरी केली आहे.

आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तीन तरुण मोटारसायकलवरून आलेल्या ट्रकजवळ आल्याची घटना घडली. त्यापैकी दोघे ट्रकवर चढतात, ताडपत्री कापतात आणि मालाने भरलेला बॉक्स खाली फेकतात, तर तिसरा तरुण मोटारसायकलवरून ट्रकच्या मागे लागतो. बॉक्स खाली फेकल्यानंतर दोघे तरुण मोटारसायकलवरून पळून जातात.

ट्रकच्या मागे जात असलेल्या कारमधील कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडियोमध्ये चोरांचा स्टंट बघून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. चोरी करण्यासाठी चोरांनी स्वत:च्या जीवावर बेतेल, अशी मोठी जोखीम पत्करली आहे.

काहीवेळा चित्रपटांचा प्रभाव असलेले काही लोक त्याच शैलीत चोरी करतात. आणि आज असाच प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे. सोशल मीडियावर नेटकरी या व्हिडिओवर कमेंटचा भडीमार करताना दिसत आहे.