मधुमेह : बेसुमार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव

आज मधुमेह भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या आहे. जगभरातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के मधुमेही भारतात असून, ही संख्या २०१७ मध्ये ७२ दशलक्षांवर गेली होती. दुर्दैवाने ही आकडेवारी २०२५ पर्यंत दुप्पट म्हणजे १३४ दशलक्षांवर जाईल, असा अंदाज आहे. हा एक गंभीर आजार असून त्यासाठी दीर्घकालीन बहुपेडी शिस्त व काळजी गरजेची असते. या आजाराचा रोगग्रस्तपणा, मृत्यू आणि आरोग्यसेवा स्त्रोतांच्या वापराशी संबंध असल्यामुळे त्याचा लक्षणीय ताण निर्माण होतो.

मधुमेह आणि इतर लगेच कळून न येणा-या आजारांचे प्रमाण वाढण्यामागे विविध घटक कारणीभूत असून, त्यात वेगाने होत असलेले शहरीकरण, बैठी जीवनशैली, असंतुलित आहार, तंबाखूचे सेवन आणि वाढलेले आयुर्मान यांचा समावेश आहे.

टाइप १ आणि टाइप २. टाइप १ मधुमेह (जो पूर्वी इन्सुलिनवर अवलंबून किंवा लहानपणी होणारा मधुमेह म्हणून ओळखला जायचा.)
इन्सुलिन निर्मितीच्या अभावाने होतो, तर टाइप २ मधुमेह (जो पूर्वी इन्सुलिनवर अवलंबून नसलेला किंवा प्रौढांना होणारा मधुमेह म्हणून ओळखला जायचा) शरीराच्या इन्सुलिन वापराच्या अक्षमतेमुळे होतो. हे ब-याचदा बेसुमार वाढलेले वजन आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव यामुळे होते. त्याशिवाय डॉक्टरांनी आणखी दोन प्रकारचे मधुमेह शोधले असून त्यात प्रीडायबेटिस आणि गर्भारपणात होणारा मधुमेह यांचा समावेश आहे.

प्रीडायबेटिस ही अशी स्थिती आहे, ज्यात रक्तशर्करा जास्त असते; परंतु टाइप २ मधुमेह होण्याइतपत जास्त नसते, तर गर्भारपणात होणारा मधुमेह उच्च रक्तशर्करेमुळे गर्भवती स्त्रीला होणारा असतो. मात्र, वैद्यकीय विज्ञान वेगाने विकसित होत असल्यामुळे मधुमेहाचे निदान, देखरेख आणि उपचारांच्या नवनवीन पद्धती येत असून, त्यामुळे या आजाराचे व्यवस्थापन आणखी प्रभावी करणे शक्य झाले आहे. अर्थात तुमच्या शारीरिक जीन्स, वय किंवा पूर्वीची जीवनशैली यांसारखे काही घटक बदलता येत नसले, तरी आता मधुमेहाची जोखीम करण्यासाठी बरंच काही करता येऊ शकते.

मधुमेह होण्यामागचे प्राथमिक कारण म्हणजे शारीरिक वजन. स्थूल असणे हे मधुमेहासाठी सर्वात जोखमीचा घटक मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्यानुसार प्रत्येक किलो (२.२ पाउंड्स) कमी केल्याने मधुमेहाचा धोका १६ टक्क्यांनी कमी होतो. संतुलित वजन राखण्याने रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तुमच्या आहारातून साखर आणि प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले कॉबरेरेट्स वजा करा. गोड पदार्थ आणि प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेली कबरेदके (रिफाइन्ड काबरेरेट्स) खाण्याने मधुमेह होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो.

मानवी शरीर या खाद्यपदार्थाचे वेगाने साखरेच्या छोटय़ा कणांमध्ये विभाजन करते आणि नंतर ते रक्तात शोषले जातात. यामुळे रक्तातील साखर वाढून त्याचा इन्सुलिन तयार करणा-या स्वादुपिंडाला, रक्तातून साखर बाहेर काढणा-या आणि शरीरातील पेशींमध्ये टाकणा-या हार्मोनला चालना मिळते. शरीरातील पेशी इन्सुलिनच्या कार्यवाहीस प्रतिरोध करणा-या असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहून प्रीडायबेटिक्स स्थिती निर्माण होते. याची भरपाई करण्यासाठी आणि रक्तशर्करा सामान्य पातळीवर आणण्यासाठी स्वादूपिंड जास्त इन्सुलिन तयार करते व कालांतराने या स्थितीचे टाइप २ मधुमेहात रूपांतर होते. कित्येक अभ्यास अहवालांमध्ये साखर किंवा रिफाइन्स काब्र्जचे सतत सेवन करण्याने मधुमेहाची जोखीम वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, अशा पदार्थाऐवजी रक्तशर्करेवर कमी परिणाम करणारे पदार्थ खाल्ल्यास जोखीम कमी करण्यास मदत होते.

ताणामुळे टाइप १, टाइप २ मधुमेह, प्रीडायबेटिस असणा-यांवर जास्त परिणाम होतो. ताणाचे व्यवस्थापन करणे हे स्वत:ला शांत व्हा आणि कामाची यादी पूर्ण करा, असे सांगण्याइतपत सोपे नसते. जेव्हा तुम्हाला मधुमेह असतो, तेव्हा ताणामुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो, त्यामुळे मधुमेहींसाठी ताणाचे व्यवस्थापन करणे हे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियंत्रण करण्याचा आणखी एक मार्ग आहे.

शरीरातील साखर व्यायामाद्वारे कमी करणे, हा मधुमेहाची जोखीम कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मात्र, त्यात नियमितता नसल्यास काहीच उपयोग होत नाही. आदर्श स्थिती सांगायची झाल्यास, आठवडय़ाला किमान १५० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. दिवसाला अर्धा तास याप्रमाणे आठवडय़ाला पाच दिवस व्यायाम करता येईल. ते न जमल्यास चालणे, पळणे किंवा सायकल चालवणे यांसारखे व्यायामही चालू शकतात. मात्र, व्यायामास सुरुवात करण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांशी त्याबद्दल बोला.

धूम्रपान आणि अतिप्रमाणात मद्यसेवनाच्या सवयींमुळे मधुमेह होऊ शकतो. यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. अतिमद्यसेवनामुळे स्वादूपिंडाला गंभीर सूज येते, ज्यामुळे इन्सुलिन स्त्रवण्याच्या क्षमतेमध्ये बिघाड होतो आणि त्याची परिणिती मधुमेहात होते. दुसरीकडे धूम्रपान हे तुम्हाला मधुमेह असो किंवा नसो, आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Leave a Comment