Disha Patani : कडाक्याच्या थंडीत हॉट ‘दिशा’ने केला कहर; शूटिंग दरम्यानचे ‘ते’ फोटो व्हायरल, पाहा…..

Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.

दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. । Disha Patani

दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात.

नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये अभिनेत्री काडकाच्या थंडीत चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचं दिसत आहे. दिशा पटानीने आपला आगामी चित्रपट ‘कल्कि 2898 एडी’ साठी हे शूट केले. । Disha Patani Upcoming Movies

प्रभाससोबत तिचे हे शूट सुरु आहे. यामध्ये ती दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट रिलीजच्या एक महिने आधी अभिनेत्रीने सोशल मीडियावर सेटवरून फोटो शेअर केले आहेत.

या फोटो-व्हिडिओला दिशाने कॅप्शनमध्ये लिहिलं, “इटली फोटो डम्प. कल्कि 2898. खूप थंडी होती.” हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

दिशा पटानी बी-टाऊनच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट शेअर करते. अभिनेत्रीने इटलीच्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी 9 मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन होऊ शकते. पण, अद्याप निर्मात्यांनी कोणतीही हिंट दिलेली नाही. चित्रपटामध्ये प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.